Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

'केवळ भाजपा (BJP) सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट आणि आमची विकेट काढायची' असं म्हणत आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर (EC) टीका करत त्यांना निवडणूक आचारसंहितेमध्ये काही बदल केले आहेत का? असा सवाल विचारला आहे. दरम्यान मध्य प्रदेश निवडणूक प्रचारादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 'भाजपाला मत द्या आणि मोफत अयोद्धेला रामलल्लाचं दर्शन घ्या.' असं विधान केले आहे. यावरूनच ठाकरेंनी भाजपाला लक्ष्य केले आहे. ज्या निवडणूक आयोगाने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार हिंदुत्त्वाच्या नावावर मत मागण्यावरून काढून घेतला होता तोच नियम आता भाजपाला लावणार का? असा सवाल विचारला आहे.यावरून त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. 'आपण निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतयं ते बघू' असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांच्या पक्षपाती वागण्यावर बोट ठेवलं आहे..

आज मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला थेट सवाल विचारला आहे. अमित शाह यांचा स्वतःच्या पक्षाच्या कर्तृत्त्वावर विश्वास नाही. सारं 'राम भरोसे' सुरू असल्याचं म्हणत आता त्यावर निवडणूका देखील ते लढणार असल्याचं म्हणाले आहेत. जर भाजपाला रामलल्लांचं दर्शन घडवायचंच असेल तर ते सार्‍या भारतवासीयांना जेव्हा भाविकांच्या मनात असेल तेव्हा घडवून आणण्याचं देखील आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने जर अशी तरतूद केली असेल तर आम्हीदेखील 'गणपती बाप्पा मोरया', 'जय भवानी जय शिवाजी' म्हणत मत मागायला सांगतो असं म्हणत निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. Thackeray on Amit Shah: अमित शाह मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा क्रमांक एकचा शत्रू; 'सामना'तून 'मार्मिक' शब्दात टीका .

पहा उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

अयोद्धेचं राम मंदिर लोकार्पण 22 जानेवारीला होणार आहे. दरम्यान राम मंदिराच्या निर्माणामध्ये शिवसेनेचा सहभाग राहिला आहे अससा वेळी उद्धव ठाकरे उद्घाटनाला अयोद्धेला जाणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी जेव्हा जेव्हा राम दर्शनाची इच्छा होते तेव्हा आपण तेथे जातो. यापूर्वीही मुख्यमंत्री असताना आणि नसतानाही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे यपुढेही तसेच घेऊ असं ते म्हणाले आहेत.