Central Railway Man Crossing Railtrack At Diva Station (Photo Credits: Twitter)

वेळ वाचवण्याच्या हट्टापायी अनेकजण रेल्वे रूळ ओलांडून जाताना आपण पहिले असतील, या महाभागांना कित्येकदा तंबी देऊन तर सोडा पण प्रत्यक्ष अशा वागणुकीमुळे जीव गमावणाऱ्यांचे उदाहरण दाखवून सुद्धा आपल्या वर्तणुकीत बदल करावासा वाटत नाही, असाच एक तरुण दिवा (Diva)  स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना अगदी क्षणाच्या फरकाने लोकलखाली येण्यापासून वाचलेला पाहायला मिळाला आहे, स्वतः मध्य रेल्वे (Central Railway) च्या ट्विटर अकाऊंटवरून या थरारक घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दिवा स्थानकात, प्लॅटफॉर्म वर लोकल येत असतानाच एक तरुण अगदी सेकेंदाच्या फरकाने रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाताना या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. या तरुणाला समोरच्या प्लॅटफॉर्मवरील गाडी पकडायची होती, कारण रूळ ओलांडून प्लॅटफॉर्म वर येताच काही झालेच नाही या अविर्भावाने हा तरुण समोरची लोकल पकडताना दिसून येत आहे. तरुणाला काही झाले नसले तरी हा प्रकार पाहतच प्लॅटफॉर्म वरील प्रवासी मात्र थक्क झाले आहेत.

मध्ये रेल्वेच्या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ शेअर करताना पुनः एकदा प्रवाशांना सूचना करण्यात आली आहे. पादचारी पूल असताना लोकांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडू नये, असं आवाहनही रेल्वेकडून करण्यात आलं आहे. तसेच संबंधित ट्रूनाचा शोध घेऊन त्याला योग्य ती शिक्षा देण्यात येईल असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ठाणे: ट्रेनच्या दारात स्टंटबाजी करताना खांबाला आपटून 20 वर्षीय मुलाचा कळवा- मुंब्रा दरम्यान मृत्यू

पहा व्हिडीओ

दरम्यान, यापूर्वी अनेकदा रेल्वे रूळ ओलांडताना अनेकांनी प्राण गमावले आहेत. यातील काहीशी संवाद साधला असता, त्यांनी आपण दूर राहतो आपल्याइथे जाणाऱ्या लोकलच्या संख्या कमी आहेत, त्यामुळे कधी उशीर झाल्यास पूल ओलांडून जाण्याऐवजी असा मार्ग निवडला जातो असे सांगितले, यावर रेल्वेने लोकलच्या संख्येत वाढ करून समाधान शोधावे अशी ही मागणी प्रवाशांकडून वारंवार करण्यात आली आहे.