Dhule Municipal Corporation | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Dhule Municipal Corporation Election 2018 Poll Results: धुळे महापालिकेसाठी (Dhule Municipal Corporation ) रविवारी (9, डिसेंबर) मतदान पूर्ण झाल्यावर आज (सोमवार, 10 डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात घेतलेली आघाडी. त्यातच भाजप आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी स्वपक्षालाच आव्हान देत मांडलेला सवता सुभा. त्यामुळे निर्माण झालेले भाजप विरुद्ध भाजप (BJP Vs BJP) असे चित्र अशा एक ना अनेक कारणांमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. आता आजच मतदान होत असल्याने घोडा मैदान दूर नाही. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे आणि कोण किती पाण्यात आहे हे स्पष्ट होणार आहे.

धुळे महानगर पालिकेसाठी एकूण 19 प्रभाग आहेत. तर एकूण सदस्य संख्या आहे 74. या निवडणुकीसाठी एकूण 3 लाख 29 हजार 569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. यात 1 लाख 74 हजार 696 पुरुष मतदार होते तर, महिला मतदार - 1 लाख 54 हजार 860. तृतीयपंथी मतदारांची संख्या होती 13. अनुसूचित जातीसाठी ६, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव होत्या. (हेही वाचा, अहमदनगर महानगरपालिका निवडणूक निकाल 2018: आज मतमोजणी, जनतेचा कौल दुपारपर्यंत स्पष्ट होणार)

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणूकीत ७४ जागांसाठी ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडीने ७४, भाजपने ६२, शिवसेनेने ५०, लोकसंग्राम पक्षाने ६०, ‘रासप’ने १२, ‘एमआयएमए’ने १२, समाजवादी पार्टीने १२ उमेदवार दिले आहेत.