
Dhule Crime News: महाराष्ट्रातील धुळे (Dhule) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भाचा सतत रडत असल्याने मामाने चार वर्षाच्या भाच्याची निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. धुळे शहरातील फिरदोस नगर येथे घडली आहे. याघटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नुरुल अमीन असं आरोपीचे नाव आहे. (हेही वाचा- झोपमोड केल्यामुळे भाडेकरुकडून घरमालकाची हत्या,
खेळता खेळता केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद हाजीत एजाज असं मृत मुलाचे नाव आहे. मोहम्मद एजाज आई आपल्या माहेरी आली होती. मरियम बी एजाज हुसेन असं महिलेचे नाव आहे. मोहम्मद एजाज त्याच्या मामाकडे खेळत होता. काही वेळाने तो अचानक रडू लागला, काही केल्या तो शांत राहत नव्हता. मोहम्मदच्या आवाजाने त्याच्या मामाला त्रास होऊ लागला. काही वेळाने त्याला राग आला आणि मोहम्मदला बाथरुममध्ये घेऊन गेला. संतापलेल्या मामाने त्याला प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकले. त्यानंतर बऱ्याच वेळ मोहम्मद घरात दिसत नसल्याने त्याची आई मरियम बी एजाज अहमद त्याला शोधू लागली. संपुर्ण घरात शोध घेतल्यानंतर मरियम बी बाथरुमकडे गेली. बाथरुममधील प्लास्टिकड्रममध्ये मोहम्मद दिसला पण ड्रममध्ये डोके पाण्यात आणि पाय वर अश्या स्थितीत आढळला. त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. यासंदर्भात नुरुल याला विचारणा केल्यावर त्याने मोहम्मद रडत असल्याचे सांगितले आणि त्यामुळे डोकं दुकत होतं म्हणून त्याला ड्रममध्ये टाकल्याचे सांगितले.
आरोपीला अटक
या घटनेनंतर आईनं हंबरडा फोडत नातेवाईकांना बोलावून घेतले. शेजारच्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतला. मोहम्मदला नातेवाईकांना हिरे रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.