Dharavi Coronavirus Update: धारावीत आज 5 कोरोना संक्रमित रुग्ण; एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,824 वर पोहोचली
Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Dharavi Coronavirus Update: धारावीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. धारावीत आज 5 कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,824 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीने जगासमोर कोरोना मुक्तीचा पॅटर्न ठेवला आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच अमेरिकेने धारावी मॉडेलचं कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे फिलिपीन्स सरकारनेदेखील धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी फिलिपीन्स सरकारने मुंबई महानगरपालिकेशी संपर्क केला होता. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 179 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर 3 जणांचा मृत्यू)

दरम्यान, राज्यात रविवारी सर्वाधिक कोरोना 23,350 संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 328 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 9,07,212 इतकी झाली आहे. याशिवाय देशात मागील 24 तासात 90 हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत.