महाराष्ट्र आणि प्रत्येक मुंबईकरासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. फिलिपीन्स (Philippines) सरकार चक्क धारावी ( Dharavi Pattern) पॅटर्नच्या प्रेमात पडले आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी ओळख असलेल्या धारावी येथे कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी मंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) जो पॅटर्न राबवत आहे. तोच पॅटर्न फिलिपीन्स (Philippines Government) सरकारला त्यांच्या देशात असलेल्या झोपडपट्टी प्रदेशात वापरायचा आहे. फिलिपीन्समध्ये लोकसंख्येची घनता अधिक आहे. झोपडपट्टीचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे झोपडपट्टी परिसरात कोरोना व्हायरस संक्रमन रोखण्यासाठी तिथल्या सरकारला धारावी पॅटर्न राबवायचा आहे. त्यासाठी फिलिपिन्स सरकारने मुंबई महापालिकेशी (BMC) संपर्क साधला आहे. देशभरामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. असे असले तरी महाराष्ट्र सरकार कोरोना व्हायरस संकटाबाबत ज्या उपाययोजना करत आहे त्याचे जगभरात कौतुक होते आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमचे ध्येय एकच आहे. व्हायरसचा पाटलाग करा. जेणेकरुन त्याच्या शेवटच्या साखळीपर्यंत त्याचा शोध घेता येईल आणि त्याला रोखण्यात यश मिळेल. आम्ही धारावी येथे लागू केलेला पॅटर्न फिलिपिन्स सरकारही अमलात आणू इच्छिते.
कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी धारावी मॉडेल हे अत्यंत सोपे आणि साधारण आहे. पहिल्यांदा साधारण चाचण्या करा. जर एखाद्या ठिकाणी काही गडबड (रुग्णसंख्या अधिक) वाटली तर चाचण्या वाढवा. संक्रमन झाल्याचे सिद्ध झाले तर लगेचच क्वारंटाइन व्हावा. धारावीतील सर्व नागरिकांनी हा पॅटर्न मान्य केला आणि अंगिकारला. त्यामुळे धारावीत कोरोना रोखणे शक्य झाले, असेही इकबाल सिंह चहल सांगतात. (हेही वाचा, Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेनंतर आता वॉशिंग्टन पोस्टकडूनही धारावी पॅटर्नचे कौतूक)
फिलिपिन्समधील एक न्यूज वेबसाईट इनक्वायररने दिलेल्या वृत्तानुसार, तिथल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, मुंबई येथील धारावी मॉडेल अतिशय चांगले आहे. आमच्याकडील लोकसंख्येची घनता विचारात घेता कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्हाला हे धारावी पॅटर्न लागू करावा लागेल.
दरम्यान, धारावी परिसरातील लोकसंख्येची घनता विचारात घेता प्रत्येकी 2.5 चौरस किलोमीटर परिसरात तब्बल 10 लाख लोक राहतात. म्हणजेच प्रति 8 ते 10 लोक प्रति 9 चौरस मीटर इतक्या जागेत राहतात. त्यामुळे इथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि कोरोना व्हायरस संक्रमनाचा सामना करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे फिलिपिन्सला धारावीचे कौतुक वाटते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनेही धारावी मॉडेलचे कौतुक केले होते.