अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा पाठिंबा? राजकीय चर्चांना उधाण
Dhananjay Munde | (Photo Credit-Facebook)

सध्या महाराष्ट्राचे (Mahashtra राजकारण पेटले असून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निर्णयानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी भाजप पक्षाची हात मिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यातच अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) पाठिंबा असल्याची चर्चा सुरु झाली आहे. धनंजय मुंडे यांचा शुक्रवारपासून मोबाईल नॉट रिचेबल असून सध्या त्यांचा फोन बंद असल्याची माहिती मिळत आहे. सध्या अजित पवार यांची राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच अजित पवार यांना पक्षातूनही काढण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानतंर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, अजित पवार यांनी भाजप यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर तर, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. मात्र, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य नसून धनंजय मुंडेंचा त्यांना पाठींबा मिळला असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या या निर्णयाला धनंजय मुंडेंचाच पाठिंबा आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, शुक्रवारपासून धनंजय मुंडे यांचा फोन नॉट रिचेबल असून आज त्यांचा फोन बंद आहे, अशी माहिती एबीपी माझा या वृतवाहिनीने दिली आहे. हे देखील वाचा- 'अजित पवार मुर्दाबाद...!' अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

दरम्यान, राष्ट्रवादी-शिवसेना यांची नुकतीच राजकीय पत्रकार परिषद पार पडली आहे. यात अजित पवार यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार, असे त्यावेळी शरद पवार म्हणाले आहेत. तर, राज्यपालांकडून भाजपला सत्ता सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत देण्यात येणार आहे.