Maharashtra Ministers Portfolio: शिंदे-फडणवीस सरकारने आज खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले. एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक ही खाती घेतली आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याच्या तिजोरीची चावी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातचं आता देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
खातेवाटपासंदर्भात माध्यमांना पहिली प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'त्यांना आमच्याकडील एखाद खातं हवं असेल तर आम्ही देऊ. तसेच आम्हाला त्यांच्याकडील एखाद खातं हवं असले तर आम्ही घेऊ. आमच्यात खात्याबाबत कोणताही वाद नाही.' (हेही वाचा -Maharashtra Ministers Portfolio: शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास तर फडणवीसांकडे 'या' खात्यांची जबाबदारी)
त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
◾️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 14, 2022
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, 'खातं कोणतं आहे, हे महत्वाचं नाही. ते खातं चालवणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे. त्या दृष्टीने त्यांच्याकडे असलेले खाते पुढील विस्तारात त्यांच्या लोकांना मिळतील. तथापी, आमच्याकडील खाते आमच्या लोकांना विस्तारात मिळतील. त्यात काही बद्दल करण्याची आवश्यकता भासली तर आम्ही मिळून ते करू.'