Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

सरकार स्थापन होवून तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतर राज्याच्या मंत्री मंडळाचा (Maharashtra Minister Portfolios) विस्तार झाला. कारण मंत्रीमंडळाच्या खाते वाटपावरुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जोरदार टीका होताना दिसत होती. 18 आमदारांचा शपथ विधी पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिल्या जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं होत. अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटप (Maharashtra Minister Portfolios) जाहीर केलं आहे. दरम्यान, खाते वाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. (हे देखील वाचा: Maharashtra: राज्य विधानपरिषदेच्या सभापतीपदावर भाजपचे लक्ष केंद्रित, 'या' नेत्याचे नाव आघाडीवर)

18 आमदारांची खाती पुढीलप्रमाने:

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास