Devendra Fadnavis | PC: Twitter/ANI

Mumbai Cyber Police यांच्याकडून आज महाराष्ट्र विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची 2 तास सागर बंगल्यावर चौकशी झाली आहे. या चौकशीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पूर्वी पाठवण्यात आलेली प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेले प्रश्न यामध्ये खूप अंतर असल्याचे म्हटलं आहे. तसेच उलट 'मीच गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्यासारखे पोलिसांनी प्रश्न विचारत सह आरोपी करता येईल याची चाचपणी झाल्याचा' देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे.

दरम्यान अहवाल सिक्रेट होता मग तो नवाब मलिक यांनी प्रसिद्ध कसा केला? असा प्रतिप्रश्न देखील केला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. सरकारनेच पोलिस बदल्यांचा घोटाळा दाबून ठेवल्याचं म्हटलं आहे. तर काही दिवसांपूर्वी सभागृहात सादर केलेले स्टींग ऑपरेशन वर महाविकास आघाडी कडून गृहमंत्री काय बोलणार याचा अंदाज आहे. त्यामुळे त्याप्रकरणी देखील थेट कोर्टात जाणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पोलिस बदल्यांच्या घोटाळ्यामधील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले पुरावे गोपनीय आणि आयपीएस दर्जाच्या ऑफिसर बद्दल असल्याने ते राज्य सरकार कडे देण्यापेक्षा केंद्र सरकार कडे दिल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Nitesh Rane On MVA: फडणवीस साहेबांना नोटीस देऊन महाविकास आघाडी सरकार स्वतःची कबर खोदत आहे - नितेश राणे .

महाविकास आघाडी सरकारसमोर आता अडचणी वाढत असल्याने विरोधकांना दाबण्यासाठी माझ्याविरूद्ध हे चौकशीचं सत्र लावल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पोलिस पुन्हा येणार की नाही हे सांगितलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.