Maharashtra Government Formation: Devendra Fadnavis यांना माहित होता BJP चा डाव; केवळ पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

Maharashtra Government Formation: महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीच्या संपूर्ण भागात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच चर्चेत होते. राज्यातील घडामोडींची सर्व माहिती त्यांच्याकडे होती. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, त्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या आवाहनाचा आदर करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद (Maharashtra Deputy CM) स्वीकारले. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, "महाराष्ट्रात होत असलेल्या प्रत्येक घडामोडीची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना होती. त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या कुशाग्र राजकीय कौशल्याशिवाय हे घडू शकले नसते. त्यामुळे फडणवीस लूपमध्ये नव्हते, हे म्हणणं योग्य नाही."

सूत्रांनी एएनआयला सांगितले की, पीएम मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना किमान दोनदा फोन केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही फडणवीस यांना ट्विटरवरून आवाहन केलं होतं. "फडणवीस यांना कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती आणि ते सरकारचा भाग नसल्याची घोषणा करतील हे कोणालाही माहीत नव्हते," असे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने एएनआयला सांगितले. सूत्रांनी पुढे सांगितले की, ही घोषणा केल्यानंतर फडणवीस यांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले होते. (हेही वाचा -Sanjay Raut Statement: मलाही गुवाहाटीतून ऑफर आली होती, संजय राऊतांचा मोठा खुलासा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "फडणवीस हे सर्वोच्च प्रशासक आणि प्रामाणिक नेते आहेत. पक्षाच्या लक्षात आले की, त्यांनी एक आश्चर्यकारक घोषणा केली आहे. त्यानंतर त्यांना काही तासांतच त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले." सूत्रांनी फडणवीस यांचे कौतुक करताना सांगितले की, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला नुकतीच तिसरी राज्यसभेची जागा जिंकता आली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकारच्या विरोधात मोठा सत्तापालट झाला.

दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक वगळून राज्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.