Sarathi Sanstha: सारथी संस्था (Sarathi Sanstha) काहीही झाले तरी बंद होणार नाही. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य अडचणीत आहे. तरीही सारथी संस्था बंद होणार नाही. उलट सारथी संस्थेला आठ कोटी रुपये राज्य सरकार देत आहे. राज्याचे विजय वडेट्टीवार हे उद्याच (10 जुलै) हे पैसे सारथीकडे वर्ग करतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजीत पवार यांनी केली आहे. सारथी संस्थेबाबत एक बैठक आज (9 जुलै) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याह मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), अल्पसंख्याक नवाब मलिक, खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje Chhatrapati) , शिवसंग्राम संघटनेचे विनय मेटे उपस्थित होते.
या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घ्यायचा सरकारचा मानस आहे. यासोबतच ण्णासाहेब पाटील महामंडळ कौशल्य विकासकडून नियोजन विभागाच्या अखत्यारित घ्यायचे. तसेच, अण्णासाहेब पाटील कर्ज देण्यासाठी आणि सारथी शिष्यवृत्ती देण्यासाठी काम करेल, अशा प्रकारचे नियोजन केले जाईल. त्यासाठी हा सर्व विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालून त्याला कॅबिनेटची मान्यता घेतली जाईल, असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Sarathi Sanstha Meeting: सारथी संस्थेच्या सभेत मानापमान नाट्य; संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान दिल्याने गोंधळ)
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांच्या आग्रहाखातर आजची सारथीची बैठक लावली होती. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात त्या दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, सोशल डिस्टन्सींगचा मुद्दा उपस्थित झाला. तरीही सर्वांचे म्हणने ऐकूण घेण्याचा प्रयत्न केला. सारथी संस्था बंद केली जाणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने अफवा उठत आहेत. सारथी बंद होणार अशा बातम्या आल्या. परंतू सारथी संस्था बंद केली जाणार नाही. कोरोना व्हायरस संकट काळात राज्य अडचणीत आहे. तरीही ही संस्था बंद केली जाणार नाही.