Delta Plus Variant in Maharashtra: रत्नागिरी, मुंबई पाठोपाठ रायगड मध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट मुळे महाराष्ट्रात तिसरा बळी; 69 वर्षीय व्यक्तीचं निधन
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचं चित्र असलं तरीही आता राज्यात डेल्टा व्हेरिएंट (Delta Plus Variant) ने चिंता वाढवली आहे. रत्नागिरी, मुंबई पाठोपाठ आता रायगड (Raigad) मध्येही डेल्टा व्हेरिएंट ने बळी घेतला आहे. हा राज्यातला तिसरा बळी आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड मधील नागोठणा मध्ये 69 वर्षीय एका व्यक्तीचा डेल्टा प्लस व्हेरिएंट मुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचे आतापर्यंत 65 रूग्ण आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.  Delta and Delta Plus Variants FAQs: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस: वारंवार विचारले जाणारे प्रश्न आण त्यांची उत्तरे.

दरम्यान मुंबई मध्येही यापूर्वी 27 जुलैला एका 63 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंट मुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती. तिने कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. या महिलेला interstitial lung disease आणि obstructive airway disease होता. यासाठी त्यांना घरीच ऑक्सिजन दिला जात होता. पण दुर्देवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

ANI Tweet

महाराष्ट्रात सध्या कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण वेगवान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात सर्वाधिक कोविड 19 प्रतिबंधात्मक लसचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या राज्यात अधिक आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंट मधील म्युटेशन आहे. तो वेगाने पसरतो तसेच त्याची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण देखील अधिक आहे. त्याचा उगम भारतामध्येच झाल्याचा संशोधकांचा दावा आहे.