कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेला नियंमण देणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta Plus Variant) मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. मुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटनेमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत महिला (वय 63) मुंबईच्या (Mumbai) घाटकोपरमध्ये (Ghatkopar) राहायला होती. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली महाराष्ट्रातील ही दुसरी घटना आहे. याआधी रत्नागिरीतील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी ओसरली असताना आता राज्यासमोर नवे संकट उभा राहिले आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट धोका वाढू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतानजक वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या 60 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरडा खोकला होता. त्याचबरोबर तिला अंगदुखीचाही त्रास होत होता. तिला चवही लागत नव्हती. तिची कोविड टेस्ट घेण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर अतिदक्षका विभागात (ICU) उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या सात रुग्णांपैकी ही महिला एक होती, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- पुणे: यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा मंडळांचा निर्णय; महापौरांनी मानले आभार
महत्वाचे म्हणजे, या महिलेने कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही तिला प्लसचा संसर्ग झाल्याने जीव गमवावा लागला आहे. मुंबईत गुरुवारी डेल्टा प्लसचे 20 नवे रुग्ण आढळून आले होते. राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची एकूण संख्या आता 65 वर पोहोचली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.