BS Koshyari Controversial Statement: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गट केंद्र सरकारकडे तक्रार करणार
Deepak Kesarkar (Photo Credit - Twitter)

मुंबईतील (Mumbai) मराठी माणसाबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा खळबळजनक विधान केलं आहे. गुजराती (Gujrati) आणि राजस्थानी (Rajasthani) निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी (Economical Capital) राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांसह राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे.  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मनसे प्रवक्ते संदिप देशपांडेंनी (Sandeep Deshpande) संबंधीत वक्तव्यावर राज्यपालांवर हल्लाबोल  केला आहे.  राज्यपालांच्या या आक्षेपार्ह विधानावर अजून तरी भाजपाकडून (BJP) कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही पण शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केली आहे.

 

शिंदे गटाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यपालांच्या या आक्षेपार्ह विधाना विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्त दिपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी सांगितलं आहे. दिपक केसरकर म्हणाले .  मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) हे दौऱ्यावरून मुंबईत आल्यानंतर सगळे आमदार त्यांना भेटणार आहोत. (हे ही वाचा:- Governor BS Koshyari On Mumbai: गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य)

 

राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्याच्या भावना राज्यपालांनी जपल्या पाहिजेत. राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने (Central Government) द्यावी, असे दिपक केसरकर म्हणाले. तसेच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मराठी माणसाची भावना केंद्र सरकारला कळवावी यासाठी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरणार असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.