मध्य रेल्वे डेक्कन क्विन Photo credits: PIB

डेक्कन क्वीन (Deccan Queen) ही मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) दरम्यान धावणारी एक महत्वाची प्रवासी रेल्वे आहे. ही गाडी 'दक्खनची राणी' म्हणूनही ओळखली जाते. कोरोना विषाणू महामारीमुळे भारतामधील रेल्वेसेवा प्रभावित झाली होती व त्याचा परिणाम डेक्कन क्वीनवरही झाला होता. आता येत्या शनिवार, 26 जूनपासून पुणे ते मुंबई धावणारी डेक्कन एक्सप्रेस गाडी सुरू होत आहे. महत्वाचे म्हणजे आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक होण्याची शक्यता आहे.

व्हिस्टाडोम कोच 40 सीटर 360-डिग्री व्ह्यू कोच आहे, ज्याला काचेचे छत आहे. या काचेच्या छतामुळे प्रवाशांना बाहेरील मनमोहक दृश्याचा आनंद घेता येतो. प्रवाशांना पर्यटनासाठी उत्तम अनुभव मिळावा यासाठी कोचमध्ये रुंद खिडक्या  विंडो पॅन आणि 360 अंशांपर्यंत फिरणाऱ्या खुर्च्या आहेत.

डेक्कन क्वीन एक्सप्रेस - 25 जून रोजी मुंबईवरून 5.10 ला सुटेल व पुण्यात रात्री 8.25 ला

डेक्कन एक्सप्रेस – मुंबईवरून सकाळी 7 वाजता निघेल. पुण्यात 11.5 ला पोहोचेल  पुढे हीच गाडी पुण्यावरून दुपारी 3.15 ला निघेल व मुंबईला संध्याकाळी 7.5 ला पोहोचेल (हेही वाचा: Tata Cancer Center सदनिकांवरुन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यात आरोप प्रत्यारोप)

मागच्या लॉकडाऊनमध्ये डेक्कन क्वीन पूर्णतः बंद होती. त्यानंतर ती ऑक्टोबरमध्ये पुन्हा सुरु झाली. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती गेल्या महिन्यात पुन्हा बंद करावी लागली होती. सध्या पुणे व मुंबईदरम्यान धावणारी ही एकमेव गाडी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. अनेक दिवस ही गाडी पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरत होती व आता ही गाडी पुन्हा सुरु केली जाणार आहे.

दरम्यान, पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी एक जून 1930 रोजी डेक्कन क्वीनची सेवा सुरू करण्यात आली. नुकतेच या गाडीला 91 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही भारताची पहिली सुपरफास्ट ट्रेन होती.