Jitendra Awhad and MLA Ajay Chaudhary | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना आमदार अजय चौधरी (Shiv Sena MLA Ajay Chaudhary) यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (नस Uddhav Thackeray) यांनी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांच्या मंत्रालयाच्या एका निर्णयाला स्थगिती दिली. या स्थगितीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)) आणि आमदार अजय चौधरी ( Ajay Chaudhary) यांच्यात आता आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. टाटा कॅन्सर रुग्णालयाला (Tata Cancer Center) 100 सदनिका देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांचे हस्तांतरणही करण्यात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली.

शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी म्हटले आहे की, गृहनिर्माण मंत्रालयाने कॅन्सरग्रस्तांसाठी जागा दिली आहे. हे चांगले असले तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यांचा प्रश्न निर्माण होतो. स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न विचारता हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिकांचा या निर्णयाला विरोधत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून

या सर्व प्रकाराची दखल घेत मी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला परंतू त्यांची भेट मिळू शकली नाही. मी त्यांना दोन पत्रं पाठवली. त्यांच्या पीएलाही भेटलो. परंतू, मार्ग निघाला नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. अखेर शेवटचा पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, मी कोणत्याही आमदाराला भेट नाकारत नाही. कॅन्सरग्रस्तांसाठी सदनीका देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी मिळाल्यानंतरच घेण्यात आला होता. जितेंद्र आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे की, टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर शरद पवार यांच्या हस्ते चावी हस्तांतर करण्याचा कार्यक्रम घ्यायचा होता. परंतू, त्या वेळी शरद पवार हे रुग्णालयात होते. त्यामुळे रुग्णालयातून परतल्यानंतर पहिलांदा तुझ्याच कार्यक्रमास उपस्थित राहिन असे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाबाबत कल्पना दिली असता ते अत्यंत संवेदनशीलपणे ते म्हणाले होते की, कार्यक्रम कर पण गर्दी करु नका. (हेही वाचा, शिवसेनेचे नेते Sanjay Raut यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप; हाय कोर्टाने दिले चौकशीचे आदेश, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, कँन्सर हवेतून पसरत नाही. कॅन्सरबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात असलेला गोंधळ दूर करता येईल. या सदनिकांमध्ये कोणत्याही प्रकारे कॅन्सर रुग्ण राहणार नाही. परंतू, कॅन्सर रुग्णावर उपचार सुरु असताना त्यांच्या कुटुंबीयांसाठी या खोल्या देण्यात आल्या आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.