Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 10 कोटी रुपये खंडणीचीही मागणी
Nitin Gadkari | (Photo Credits: Facebook)

Death threat to Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात दुरध्वनीद्वारे ही धमकी देण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलनजिक असलेल्या गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आले. धक्कादायक म्हणजे या आधीही गडकरी यांना अशाच प्रकारे धमकी आली होती. जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदा गडकरी यांना धमकीचा फोन आला होता. त्याही वेळी धमकी देणाऱ्याने खंडणी मागितली होती आणि आताही 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

बेळगावच्या कारागृहात असलेल्या जयेश कंठा नावाच्या आरोपीच्या नावे हे धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वीही त्याच्याच नावाने धमक्या आल्या होत्या. गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धमक्यांचे फोन येताच तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी धमक्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. (हेही वाचा, Nitin Gadkari: मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो, सरकारच्या भरवश्यावर राहू नका; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अनोखा सल्ला)

नितीन गडकरी यांना या आधी जयेश कंठा नावाच्या व्यक्तीकडूनच धमकी आलीहोती. जयेश कंठा हा बेळगावी कारागृहातील आरोपी आहे. आता पुन्हा एकदा त्याच्याच नावाने धमकी आल्याने पोलिस कसून चौकशी करणार आहेत.