Death Due to Cat Bite: महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. मांजर चावल्यानंतर एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील उखडी गावात घडली आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. सांयकाळच्या वेळीस जेव्हा मुले घराजवळ खेळत होते. त्यावेळी अचानक ही घटना घडली. हेही वाचा- सांगलीत डॉल्बीच्या दणदणाटीमुळे आणखी एक मृत्यू? रस्त्यावर सापडला अज्ञात मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील श्रेयांशु पेंदाम असं या मृत बालकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मुलाच्या मृत्यूचा कारण समोर येईल. शनिवारी श्रेयांशु आपल्या मित्रासोबत खेळत होता. घराजवळ एक मांजर त्याच्या जवळ आली. मांजरी सोबत खेळता खेळता त्याला पायाला चाव घेतला. ही घटना कळताच त्याला रुग्णालयात घेऊन गेले पंरतु त्याचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केले.