शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava) घेण्यासाठी दाखल केलेल्या परवानगी अर्जाला मुंबई महापालिकेने (BMC) महिना उलटला तरी परवानगी दिली नाही. त्यामुळे पालिकेच्या दप्तरदिरंगाईला कंटाळून शिवसेना (Shiv Sena) अखेर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) पोहोचली आहे. शिवसेनेने बुधवारी दाखल केलेल्या याचिकेवर आज (22 सप्टेंबर) सुनावणी घेतली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्ट आज काय निर्णय घेतेल याबाबत मोठी उत्सुकता आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यावर 72 तासामध्ये परवानगी अथवा महापालिकेचे मत येणे अपेक्षीत असते. मात्र आता एक महिना उलटला तरी महापालिकेने कोणताच निर्णय दिला नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयात यावे लागले आहे. दरम्यान, न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर आज प्राथमिक सुनावणी पार पडणार आहे.
शिवजी पार्क आणि शिवसेना दसरा मेळावा या पाठिमागच्या अनेक वर्षांच्या समिकरणाला यंदा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे खरी शिवसेना कोणाची? हाच एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. दरम्यान, आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने केला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट अशा दोघांनीही मैदानासाठी दावा केला आहे. (हेही वाचा, Aditya Thackeray On Shinde Govt: वर्सोवा-वांद्रे सीलिंकच्या कामाच्या जाहिराती आणि मुलाखती मुंबईऐवजी चेन्नईत का झाल्या, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल)
दसरा मेळाव्याचा दिवस हळूहळू पुढे येत आहे. यंदा 5 ऑक्टोबर या दिवशी दसरा येतो आहे. त्यामुळे शिवाजी पार्क यासारख्या मैदानावर दसरा मेळावा घ्यायचा तर पूर्वतयारी आवश्यक असते. शिवाजी पार्क हे मैदान खूप मोठे आहे. त्यामुळे या मैदानावर सभा घ्यायची तर तशी पूर्वतयारीही दणक्यात करावी लागते. त्यामुळे लवकर परवानगी मिळाल्यास तशी तयारी करता येते. त्यामुळे पालिकेची परवानगी लवकर मिळणे आवश्यक असते. पण, प्रथमच असे होत आहे की, शिवसेनेने केलेल्या अर्जाला मुंबई महालिकेने परवानगी देण्यास विलंब लावला आहे.
शिवसेना व शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी यांनी अॅड. जोएल कार्लोस यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या रिट याचिकेत मुंबई महापालिका, महापालिका आयुक्त व जी-उत्तर प्रभागाचे सहायक आयुक्त यांना प्रतिवादी आहेत. शिवसेनेची याचिका आल्यावर याचिकेतील प्राथमिक माहिती पाहून या याचिकेवर आज तातडीने प्राथमिक सुनावणी ठेवली. या याचिकेवर ज्येष्ठ वकील अॅस्पी चिनॉय शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.