कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) ठेवण्यात आला आहे. यामुळे सर्व शासकीय वाहने आणि खाजगी वाहन सेवा देखील पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे घरी पायी चालत जाणा-या 5 मजूरांवर काळाने घाला घातला. मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) मार्ग पायी चालत जाणा-या या 7 मजूरांवर समोरून येणा-या आयसार टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत 5 मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात खूपच भीषण होता की यातील 5 जण जागीच ठार झाले. लॉकडाऊनच्या काळात घरी पायी चालत जाणे या मजूरांच्या जीवावर बेतल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्याeत आल्यामुळे सुट्टीत आपल्या गावी वा आपल्या घरी जाणा-यांची चांगलीच गोची झाली आहे. यामुळे ऐन सुट्टीच्या दिवसात हा लॉकडाऊन झाल्याने संपूर्ण वाहतूक सेवा पूर्णपणे बंद ठप्प झाली आहे. त्यामुळे या घटनेतील मजूरांनी आपल्या घरच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला होता. गुजरात कंदील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना एका भरधाव वर्गाने येणाऱ्या आयसार टेम्पोने यांना जोरदार धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. Coronavirus: राज्यातील नागरिकांनी अनधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मांडले 'हे' महत्वाचे मुद्दे
जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास करत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांकरिता संचारबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर काहीजण ट्रकच्या मागे लटकून प्रवास करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला आहे. याच गोष्टीवरून मला धक्काच बसला असे सांगत उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. याशिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जिथे आहात, तिथेच राहणे महत्वाचे आहे. तसेच पुढील 15-20 दिवस राज्यातील लोकांसाठी कसोटीचे आहेत, असेही ते म्हणाले आहेत.