अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. संजीव पुनाळेकर यांनी हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असून ते यापूर्वी 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत होते. (नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांना मुंबईतून अटक)
संजीव पुनाळेकर यांच्या मोबाईलमधून काही महत्त्वाची माहिती हाती आली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी संजीव पुनाळेकर यांना पुन्हा सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सुर्यवंशी यांनी न्यायालयात केली होती. (संजीव पुनाळेकर यांनी हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली: सीबीआय विशेष सरकारी वकील)
ANI ट्विट:
Dabholkar murder case: Pune Sessions Court grants CBI custody of accused Sanjeev Punalekar till 23 June. He was in judicial custody in the same case from 4 June till now.
— ANI (@ANI) June 20, 2019
20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात सकाळच्या वेळेस दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे ही दोन नावे समोर आली. या दोघांनी मिळून हत्येसंर्भातील पुरावे, हत्यारे नष्ट करण्यास मदत केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती.