नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे, संजय पुनाळेकर यांना मुंबईतून अटक
डॉ.नरेंद्र दाभोळकर (फोटो सौजन्य- ट्विटर)

अंदश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अजून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विक्रम भावे आणि अॅड  संजीव पुनाळेकर यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तर उद्या सुट्टीकालीन न्यायालयात पुनाळेकर आणि भावे यांना हजर करण्यात येणार आहे.

नरेंद्र दाभोळकर यांची हत्या 2013 मध्ये पुण्यात सकाळीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआयकडून सचिन अंदुरे आणि हिंदू जनगागृती समितीचे सदस्य वीरेंद्र तावडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या दोन आरोपींच्या चौकशीमध्ये जी माहिती उघडकीस आली त्यामध्ये पुनाळेकर आणि भावे यांची नावे पुढे आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांनी पुनाळेकर आणि भावे यांच्या सांगण्यावरुन मुंबईतल्या खाडी पुलावरुन नष्ट करण्यास सांगितले होते. परंतु अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून या दोघांना अटक करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे निषेध व्यक्त केला आहे. (Narendra Dabholkar murder case: डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येतील 3 आरोपींना न्यायालयाकडून जामीन)

पुनाळेकर आणि भावे या दोघांनी मिळून हत्येच्या संदर्भात पुरावे नष्ट करण्यात आल्याचा प्रयत्न केल्यामुळे यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. ठाणे येथे गडकरी रंगायतन मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाप्रकरणी भावे याला अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्याची जामीनपूर्व सुटका करण्यात आली होती. तसेच पुनाळेकर हा विविध गुन्ह्याच्या प्रकरणी वकिल म्हणून कार्य करतो.