सोने दर हा नेहमीच अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. त्यात हा दर प्रतिदिन बदलत असल्यामुळे सोने (Gold Price Today) आज किती रुपयांनी वाढले किंवा कमी झाले याबाबत दैनंदिन उत्सुकता असते. मग सोने खरेदी करायचे असो किंवा नसो. उत्सुकता कायम. अर्थात आजही सोने दरबाबात (Gold Price ) उत्सुकता असणारच. म्हणूनच आम्ही मुंबई, दिल्ली, बंगळुरु, लखनऊसह इतर राज्यांमध्ये आज (7 एप्रिल 2021) सोने काय दरने विकले जात आहे याचा भाव देत आहोत.
प्राप्त माहितीनुसार, 22 कॅरेट सान्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर हा साधारण 44,200 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा प्रती 10 ग्रॅमचा दर हा 45,200 रुपये इतका आहे. ज्या ग्राहकांना 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे 100 ग्रॅम सोने खरेदी करायचे आहे त्यांना अनुक्रमे 4,42,000 रुपये आणि 4,52,000 रुपये इतकी रक्कम मोजावी लागू शकते. (हेही वाचा, Bitcoin: बिटकॉइन म्हणजे काय? कशी होते गुंतवणूक? कशी वाढते पैशांची किंमत?)
देशातील महत्त्वाच्या शहरांमधील सोने दर (22 कॅरेट, सर्व दर प्रती 10 ग्रॅम)
दिल्ली- 44,550, मुंबई- 44,200, चेन्नई- 42,570, बंगळुरु-42,400, लखनऊ- 44,550, केरळ- 42,400, नागपूर- 44,200,
देशातील महत्त्वाच्या शहरांमधील सोने दर (24 कॅरेट, सर्व दर प्रती 10 ग्रॅम)
दिल्ली- 48,600, मुंबई- 45,200, चेन्नई- 46,450, बंगळुरु-46,250, लखनऊ- 48,600, केरळ- 46,250, नागपूर- 45,200
देशातील इतर काही महत्त्वाच्या शहरांमधील सोने दर
शहर | 22 कॅरेट सोने (प्रती 10 ग्रॅम) | 24 कॅरेट सोने (प्रती 10 ग्रॅम) |
कोईम्बतूर | Rs 42,570 | Rs 46,450 |
भुवनेश्वर | Rs 42,400 | Rs 46,250 |
पाटना | Rs 44,200 | Rs 45,200 |
पुणे | Rs 44,200 | Rs 45,200 |
विशाखापट्टनम | Rs 42,400 | Rs 46,250 |
अहमदाबाद | Rs 44,400 | Rs 46,300 |
चंडीगड | Rs 44,550 | Rs 48,600 |
जयपूर | Rs 44,550 | Rs 48,600 |
सोने हा हमखास चांगला मोबदला देणारी गुंतवणूक असल्याचे अनेकांना वाटते. त्यामुंळे देशातील अनेक नागरिक सोने गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर सोने गुंतवणुकीतून मिळालेला परतावाही तिकका मोठा आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळत आहे.