Airport Representational Image (Photo Credits: ANI)

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) दोन्ही धावपट्ट्या दुरूस्ती आणि देखभालीचं काम आज (2 मे ) सुरू आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या कामाला सुरूवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते सुरू राहणार आहे. या 6 तासांच्या कामांमध्ये सुमारे 800 विमानसेवांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एअरपोर्ट अथॉरिटीकडून देन्यात आलेल्या माहितीनुसार, 6 नंतर उड्डाणांना पुन्हा सुरूवात केली जाईल. पावसाळ्यापूर्वी धावपट्टींची दुरूस्ती करणं आवश्यक आहे. त्यामुळे पाऊस होण्यापूर्वी आज हे काम हाती घेतलं जात आहे. या कामाच्या दरम्यान धावपट्टीच्या जवळ असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल ही महत्त्वाची कामे केली जातील. तसेच विमानतळ देखभालीसाठी, तज्ञ मायक्रोटेक्‍चर आणि मॅक्रोटेक्‍चर विअर अ‍ॅन्ड टिअर होण्‍यासाठी धावपट्टीच्या पृष्ठभागाची तपासणी करतात आणि कमतरता ओळखल्या जातात. मुंबई विमानतळाने विमान कंपन्या, विमान वाहतूक प्राधिकरण आणि त्याच्या अनेक स्‍टेकहोल्‍डर्स च्या मदतीने दुरुस्ती आणि देखभाल योजना तयार केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात व्यस्त सिंगल रनवे एअरपोर्ट आहे. एका दिवसात या विमानतळावरून 900 विमानांचे उड्डाण होते.