Cruise Ship Drug Case: NCB ची कारवाई आणि नवाब मलिक यांचे आरोप यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया; पहा Video
Devendra Fadnavis | (File Photo)

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरुन (Cruise Drug Party Case) राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. एनसीबी (NCB) च्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जोरदार टीका केली आहे. यावर एनसीबीने देखील चोख उत्तर दिले आहे. मात्र आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे. (Cruise Ship Drug Case: 3 जणांना नाही 6 जणांना सोडलं; नवाब मलिक यांच्या आरोपावर NCB चं उत्तर)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या प्रकरणात एनसीबीने अनेक लोकांना पकडलं होतं. त्यातील जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आणि ज्या लोकांकडे काही सापडलं त्या लोकांना त्यांनी पकडलं, हे एनसीबीने यापूर्वी स्पष्ट केलं आहे. ड्रग्स ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. याच्या विरुद्ध एखादी एजन्सी जर काम करत असेल तर त्याच्यापाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही. तर हा आपल्या समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. परंतु, याचं राजकारण केलं जात आहे. यात एनसीपीच्या नेत्याचा माणूस देखील सोडण्यात आला. तो क्लीन असल्याने त्याला सोडण्यात आले. त्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचं होतं, हा मुद्दाच येत नाही."

नवाब मलिक यांच्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, "मी मागे देखील बोललो की नवाब मलिकांचं दुखणं वेगळं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात मी पुन्हा बोलणार नाही." (Cruise Drug Ships Case: क्रूज ड्रग्स पार्टी छाप्यावेळी एनसीबीने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडले- नवाब मलिक)

पहा व्हिडिओ:

या मुद्दयावरुन कोणीही राजकारण करु नये. याउलट आपल्या मुलांना बिघडवणाऱ्या या गोष्टीविरुद्ध एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी देखील नवाब मलिक यांच्या एनसीबीवरील आरोपांवरील काही सवाल उपस्थित केले आहेत.