राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीने (NCP) ज्या क्रुझवर छापे मारले त्या वेळी एकूण 11 जणांना पकडले होते. त्यापैकी तीन जणांना सोडण्यात आले. यातअमिर फर्निचरवाला (Amir Furniturewala), रिशब सचदेव ( Rishabh Sachdev), प्रतीक गाभा (Pratik Gabha) यांचा समावेश आहे. हे तिघेही भाजप नेत्यांचे नातेवाईक आहेत. छापा मारला तेव्हा क्रुझवर 1300 लोक होते. त्यापैकी केवळ निवडक 11 लोकांना पकडले. त्यातही तिघांना का सोडले? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी क्रुझवर टाकलेला छापा हा पूर्णपणे बनावट होता. तो दिल्लीतील आणि भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन टाकला होता का असा संशय आता येऊ लागला आहे. आपण एनसीबीवर आरोप केले आहेत ते पूर्णपणे सत्य आहेत. जर आपण दिलेल्या माहितीवर कोणास संशय असेल तर आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत. नवाब मलीक यांनी थेट विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाच आव्हान दिले आहे. नवाब मलीक न्यायाधीश नाहीत, त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी ती एनसीबीला द्यावी, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले होते. (हेही वाचा, Cruise Ship Drugs Case: आर्यन खान, अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांना दिलासा नाही, न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज)
एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे फर्जीवाडा आहे. आर्यन खान याचा पंचनामा कॉम्पूटरवर टाईप केलेला आहे. तर मुनमुनचा पंचनामा हाताने लिहिलेला आहे. मित्रांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन आर्यन खान हा तिथे गेला होता. ज्यांचे निमंत्रण स्वीकारुन आर्यन खान तिथे गेला होता त्यांना एनसीबीने छापा टाकला त्या वेळी का सोडण्यात आले असा सवालही मलिक यांनी व्यक्त केला आहे.
फरार आरोपी गोसावी क्रुझ पार्टी छापा प्रकरणात पंच कसा झाला? क्रुझ पार्टी छापा म्हणजे एक कट आहे. या कटात भाजप नेते असल्यानेच त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. आर्यनला अटक करुन पुढचं टार्गेट शाहरुख असल्याची बातमी पेरण्याचा प्रयत्न असल्याचाही नवाब मलीक यांनी म्हटले आहे.