Thane: ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे शाखेच्या युनिटकडून तीन जणांना अटक करण्यासह मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या काड्या आणि डेटिनोटर्स जप्त केले आहेत. गुन्हे शाखेने 1000 डेटिनोटर्स आणि 1000 जिलेटिनच्या काड्या ताब्यात घेतल्या आहेत. तपासकर्त्यांनी असे सांगितले की, जिलेटिनच्या काड्या या पाच बॉक्समध्ये प्रत्येकी 20 काड्यांनुसार भरल्या होत्या.(Sameer Wankhede Case: समीर वानखेडेंना मोठा झटका, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हॉटेल आणि बारचा परवाना रद्द)
गुन्हे शाखेचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी असे म्हटले की, भिवंडीत मोठ्या प्रमाणात स्फोटकांची वाहतूक करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिवंडी युनिटचे प्रमुख पोलीस इन्स्पेक्टर सचिन गायकवाड यांनी नादी नाका येथे सापळा रचला. त्यानुसार त्यांनी आरोपीला अटक करण्यासह त्यांना मारुती कारसुद्धा जप्त केली.(Pune: 300 कोटींची Cryptocurrency आणि 8 लाखांच्या खंडणीप्रकरणी शेअर ट्रेडरचे अपहरण, पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांना अटक)
अल्पेश पाटील (34), पंकज चव्हाण (23) आणि समीर वेडगा (27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी पालघर जिल्ह्यात राहणारे असल्याची माहिती देण्यात आली आहे. तपासकर्त्यांनी सांगितले की, या सर्व स्फोटकांची अनधिकृत पद्धतीने आणि कोणत्याही परवानगीशिवाय वाहतूक केली गेली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात कलम 286, स्फोटक पदार्थ कायद्यातील कलम 5 नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.