Pune: 300 कोटींची Cryptocurrency आणि 8 लाखांच्या खंडणीप्रकरणी शेअर ट्रेडरचे अपहरण, पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांना अटक
Arrested accused. (Photo Credits: ANI)

Pune: 300 कोटी रुपयांची क्रिप्टो करेंन्सी (Cryptocurrency) आणि 8 लाखांच्या खंडणीसाठी शेअर ट्रेडिंगमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. यामधील धक्कादायब बाब अशी की, या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा एक पोलीस कर्मचारी निघाला आहे. सदर आरोपी हा पिंपरी-चिंचवड येथील पोलीस स्थानकात कार्यरत आहे. यापूर्वी तो पुण्यातील सायबरल सेलसाठी काम करायचा. त्याला क्रिप्टो करेंन्सी संदर्भात बरीच माहिती होती. त्याला कळले होते की, शेअर ट्रेडरकडे 300 कोटी रुपयांची क्रिप्टो करेंन्सी आहे.

शेअर ट्रेडरकडून पैसे उकळण्यासठी पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून त्याचे अपहरण केले. पोलिसांना याबद्दल त्याने चुकून सुद्धा कळू दिले नाही. या प्रकरणी वाकड पोलिसांन सापळा रचून आरोपी पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांना अटक केली आहे.(Thane Crime Branch: ठाणे गुन्हे शाखेकडून एक हजार Gelatin Sticks आणि 1000 डिटोनेटर्ससह तीन आरोपींना अटक)

Tweet:

दिलीप तुकाराम खंदारे असे आरोप पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण 14 जानेवारीचे असून शेअर ट्रेडर विनय सुंदरराव नाईक याचे एका हॉटेलमधून अपहरण करण्यासह त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्याच्या विरोधात रफिक सय्यद याने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी असे म्हटले की, 14 जानेवारीला विनय नाईक याचे सात-आठ जणांनी अपहरण केले. तेव्हा तो तथावडे येथील एका हॉटेलमध्ये होता. नाईक याचा मित्र सय्यद याने वाकड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच तक्रार दाखल करत घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटिव्ही फुटेज तपासून पाहिले. याच दरम्यान, आरोपीला कळले की पोलिसांना आपल्याबद्दल कळले. तेव्हा त्यांनी नाईक याला वाकड परिसरात सोडून पळ काढला.