महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत (Mumbai) आढळून आले आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईसह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. मात्र, मुंबईतील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्येने आज चीनलाही मागे टाकले आहे. ज्यामुळे संपूर्ण मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईत आज आणखी 806 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 64 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 86 हजार 132 वर पोहचली आहे. यापैकी 4 हजार 999 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज 1 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मुंबईत करोनाबाधित रूग्ण बरे होण्याचा दर 67 टक्के एवढा आहे. तर मुंबईत करोनाबाधित रूग्णांची वाढ होण्याचा दर हा 1.60 टक्के इतका आहे. मुंबईतील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे. चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगात कोरोनाचे जाळे पसरत गेले आहे. चीनमधील कोरोनाबाधितांचा आकडा 83 हजार 565 वर गेला आहे. यापैकी 4 हजार 634 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 78 हजार 528 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- COVID19: औरंगाबाद येथील शिवसेना नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व BKCया ठिकाणी मिळून उभारण्यात आलेल्या विविध कोरोना आरोग्य केंद्रातील एकूण 3 हजार 520 रुग्णशय्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करण्यात आले. हे बेड्स कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.