
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हाहाकार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच औरंगाबाद (Aurangabad) येथील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे (Nitin Salve) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात सोमवारी अनेक भागात निर्बंध लागू करण्याचा घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 2 आणि शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Pune: पुण्यातील BJP आमदार मुक्ता टिळक व आईला कोरोना विषाणूची लागण; घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला
महाराष्ट्रात आज तब्बल 5 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 17 हजार 121 वर पोहचली आहे. यापैकी 9 हजार 250 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 18 हजार 558 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.