Mumbai Police Commissioner | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई (Mumbai) विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मुंबई पोलीस (Mumbai Police) दंड आकारणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Param Bir Singh) यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढीमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईत अटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तसेच कोरोना नियमाचे आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या कोरोना संदर्भातील नव्या गाईडलाईन्सनुसार, मुंबईतील 1 हजार 305 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेच मास्क आणि सोशल डिस्टन्सिंचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मुंबई आज एका दिवसात तब्बल 16 हजार 14 जणांकडून दंड आकरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-नागपूर: सिताबर्डी रस्त्यावर कोविड-19 च्या नियमांचे वाजले तीन-तेरा, गर्दीची दृश्ये पाहून तुम्हालाही बसेल धक्का, See Pics

ट्विट-

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येत असल्याचे चिन्ह निर्माण झाले असताना पुन्हा एकदा शहरातील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबई आज 921 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 4 मृत्युची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 19 हजार 128 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 99 हजार 546 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 11 हजार 442 जणांचा मृत्यू झाला आहे.