एकीकडे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकार कोरोनाचे नियम अधिकाधिक कडक करत असताना नागपूरच्या (Nagpur) सिताबर्डी मेन रोड (Sitabardi Main Road) वर नागरिकांनी मात्र या नियमांची पायमल्ली केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या रोडवर नागरिकांची अफाट गर्दी पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कोरोनाचे गांभीर्य लोकांनी लक्षात घेतले नसून त्याचाच परिणाम काही दिवसांतच दिसून येणार आहे. ANI ने टिपलेले हे फोटो पाहून सरकारला आणि विशेषत: कोरोनाला लोक किती गांभीर्याने घेत आहेत याची प्रचिती येईल.
नागपूरच्या सिताबर्डी मेन रोडवर झालेली गर्दी पाहून येथे कोविड-19 च्या नियमांचे तीन-तेरा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. हे फोटो पाहून नागरिक कोरोनाला किती हलक्यात घेत आहे हे दिसून येत आहे.हेदेखील वाचा- उद्यापासून धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर बंदी आणण्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'Lockdown' बाबत केली 'ही' महत्त्वाची घोषणा
पाहा फोटोज
Maharashtra: People flout social distancing norms at Sitabuldi main road in Nagpur today. #COVID19 pic.twitter.com/EgL1bRqMi0
— ANI (@ANI) February 21, 2021
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेची संवाद साधत कोरोनाबाबत राज्यातील स्थिती सांगितली. यावेळी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून ही लाट राज्याच्या उंबरठ्यावर आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करा, आपल्यावर लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गर्दी करणे टाळा. ऑफिसच्या वेळेत बदल करा. वर्क फ्रॉम होम वर भर द्या. अर्धे कर्मचारी ऑफिसात अर्धे वर्क फ्रॉम होम अशी योजना आखा. लॉकडाऊन हवा की नको हे पुढील 8 दिवसांत कळेल. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी नियमांचे उल्लंघन करतील, ज्यांना नको ते नियम पाळतील असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.