CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार जनतेशी संवाद साधला. यात लोकांनी अनलॉकच्या टप्प्यात घातलेल्या नियमांचे पालन न केल्याने ही परिस्थिती ओढावली असून राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्तविली आहे. यामुळे एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता 'उद्यापासून राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच "राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल" असेही ते म्हणाले.

राज्यात आपण काही दिवसांपूर्वी 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' अशी मोहिम राबवली होती. ती बदलून आताची परिस्थिती पाहून 'मी जबाबदार' अशी नवी मोहिम आपण सर्वांनी मिळून राबवूया असे त्यांनी सांगितले.हेदेखील वाचा- Uddhav Thackeray Address To Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्पष्ट

पाहूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • कोरोना लसीचे साइड इफेक्ट्स नाही
  •  सामान्यांसाठी लवकरच लस उपलब्ध होणार
  • कोरोना विरुद्ध लढायचे असेल तर मास्क हीच आपली ढाल आहे त्यामुळे मास्क वापरणे अनिवार्य आहे
  • कोरोनाची दुसरी लाट आली आहे की नाही हे येत्या 10-15 दिवसांत कळेल.
  • उद्यापासून धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर बंदी
  •  उद्यापासून जिथे वाटेल तिथे बंधनं घाला असे जिल्हाधिका-यांना आदेश
  • लग्न सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉल मालकावर कारवाई होणार
  • महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, गर्दी करणे टाळा.
  •  ऑफिसच्या वेळा बदला. वर्क फ्रॉम होम वर भर द्या.
  • अर्धे कर्मचारी ऑफिसात अर्धे वर्क फ्रॉम होम अशी योजना आखा
  •  लॉकडाऊन हवा की नको हे पुढील 8 दिवसांत कळेल
  • ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी नियमांचे उल्लंघन करतील, ज्यांना नको ते नियम पाळतील.
  • सोशल डिस्ंटस, वारंवार हात धुणे, मास्क लावणे या त्रिसूत्री नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
  • उद्यापासून राज्यातील सर्व राजकीय बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील.

थोडक्यात राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली असून कोरोनाच्या नियमांचे पालन करा. लॉकडाऊन करण्याची वेळ आणू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.