COVID19: नागरिकांना कोरोनावरील लस घेणे अधिक सोईस्कर व्हावे यासाठी मुंबई महापालिकेकडून शहरातील काही परिसरात रात्रीच्या वेळेस लसीकरण मोहिम पुढील काही दिवसात सुरु केली जाणार आहे. त्याचसोबत My Office, a safe space ही सुद्धा मोहिम राबवली जाणार असून कार्यालयाच्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करणे हे त्यामागील मुख्य उद्दीष्ट असणार आहे.(Omicron Variant: धारावीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क, बीएमसी राबवणार नवीन योजना)
महापालिका अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये कोविड19 वरील लसीचा दुसरा डोस घेण्याचा दर वाढला जाईल. सध्या 92.3 लाख नागरिकांना कोरोनावरील लसीचा पहिला तर 79 टक्के जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. शनिवारी 83,657 नागरिकांनी कोरोनावरील लसीचा डोस घेतला आहे.
या व्यतिरिक्त पोलिओ डोस देण्यास सुद्धा आरोग्य कर्मचारी पुढे येणार आहे. ज्यांना सकाळच्या वेळेस डोस घेण्यास जमले नाही त्यांना संध्याकाळी येऊन तो घेता येणार आहे. अशीच पद्धत आम्ही कोरोनावरील लसीसाठी सुद्धा लागू करणार असल्याचे महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी म्हटले आहे.(Omicron Variant: आज महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही)
सध्या बहुतांश महापालिकेच्या सेंटरमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लसीचे डोस दिले जातात. परंतु आता त्यासाठीचा वेळ वाढवून 10 वाजेपर्यंत केला जाणार असल्याचा विचार केला जात आहे. मात्र यासाठी काही वेळ लागेल असे ही गोमरे यांनी सांगितले.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी लसीकरणाचा दररोजचा आकडा खाली येत होता. यामागील कारण म्हणजे दिवाळी आणि नवरात्रौत्सव. त्याचवेळी महापालिकेकडून मोबाईल लसीकरण सेवा नागरिकांच्या राहण्याच्या ठिकाणी सुरु केली गेली.
पण आता कोरोनावरील लसीचे डोस घेण्याचा वेग गेल्या 10 दिवसात वाढला आहे. तर कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात यावे यासंदर्भात एक पत्र सुद्धा लिहिले आहे.