मुंबई: मराठी बोलण्यास सांगितल्याने शिवाजी पार्क येथे कुरिअर बॉयचा दोन महिलांवर हल्ला
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

मराठीतून बोलण्यास सांगितले म्हणून एका कुरिअर बॉयने (Courier boy) दोन महिलांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो बांग्लादेशी असल्याची प्राथमिक माहिती आली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील गुरुकृपा इमारीतीत ही घटना घडली. या इमारतीत राहत असलेल्या सुजिता पेडणेकर आणि विनीता पेडणेकर यांच्या घरी एक युवक सकाळी 11 च्या सुमारास कुरिअर घेऊन आला. कुरिअर बॉयला या महिलांनी मराठीतून संवाद साधण्यास सांगितले. मात्र या गोष्टीचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करत महिलांना मारहाण केली. एका महिलेच्या डोक्यात ठोसा मारला तर दुसरीवर पेनाने वार केला.

त्यानंतर या तरुणींनी स्थानिकांच्या मदतीने कुरिअर बॉयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.