Coronavirus Vaccination: मुंबईत नागरिकांच्या दारोदारी जाऊन लस देण्यास परवानगी नाही
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

Coronavirus Vaccination: मुंबई महापालिकेने नागरिकांच्या दारोदारी जाऊन लस देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला होता तो त्यांना नाकारला आहे. कारण महापालिकेने जेष्ठ नागरिक, अपंग आणि अंधत्व असलेल्या नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही त्यामुळे अशा नागरिकांच्या दारोदारी जाऊन लस दिली जावी असे प्रस्तावात म्हटले होते. त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची मोहिम मॅक्रो लेव्हलमध्ये केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे नागरिकांना दोन किलोमीटर पेक्षा अधिक अंतरावर जाऊन कोरोनाची लस घेण्याचा त्रास वाचणार आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी असे म्हटले की, मुंबईत जवळजवळ 1.5 लाख नागरिक असे आहेत जे जेष्ठ नागरिक, अपंग आणि काहींना बेड्वरुन हलता सुद्धा येत नाही. त्यामुळे आम्ही केंद्राला अशा लोकांसाठी दारोदारी जाऊन लस देण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. परंतु केंद्राच्या अधिकाऱ्यांनी अशा कोणत्याच पद्धतीची पॉलिसी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र जर त्यांनी खरंच त्यासाठी परवानगी दिली असती तर त्या लोकांना मदत झाली असती.(KDMC COVID 19 Guidelines: कल्याण -डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विकेंड लॉकडाऊन दरम्यान रविवार ऐवजी सोमवारी दुकानं बंद)

दरम्यान, अंधेरीतील भाजपचे आमदार अमित साटम यांनी झोपडपट्टी विभागात लसीकरण मोहिम पूर्णसक्षम पद्धतीने सुरु नसल्याचे त्यांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने 100 नागरिकांसोबत रहिवाशी इमारतीत स्पेशल कॅम्पेन सुरु करावे जेणेकरुन त्याचा अधिकाधिक जणांना फायदा होऊ शकतो.अशाच पद्धतीचा कार्यक्रम चैन्नईत यशस्वी झाल्याचे साटम यांनी म्हटले आहे.(Night Curfew in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून रात्रीची जमावबंदी, रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान हॉटेल्स, मॉल्स, बगीचे, सिनेमागृहे राहणार बंद)

तर दरोदारी जाऊन लस देण्यास नकार यासाठी दिला गेला आहे की, जर एखाद्याला लस दिली तर त्याच्या प्रकृतीकडे प्रथम लक्ष द्यावे लागणार आहे. त्यानंतर प्रत्येकाला घरोघरी जाऊन लस देण्यास सुरुवात केली तर लसीकरणाचा आकड्यात घट होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.