मुंबईत कोरोना व्हायरस (Coronavirus Updates In Mumbai) संक्रमितांची धक्कादायक आकडेवारी पुढे येत आहे. पाठिमागील 24 तासात मुंबईत (Mumbai) तब्बल 3671 जणांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. ही आकडेवारी आज (गुरुवार, 30 जानेवारी) सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. दरम्यान, पाठिमागील 24 तासात कोरोनावरील उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या केवळ 371 इतकी आहे, मुंबई महापालिकेने (BMC) याबाबत माहिती दिली. पाठिमागील काही दिवसांमध्ये नव्या संक्रमितांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढत होती. त्यामुळे कोरोना संसर्गाचा सरासरी वेगही मंदावला होता. तसेच, कोरोना सावटाचे मळभ दूर होऊन वातावरण निवळण्यास मदत होत होती. दरम्यान, कोरोना संक्रमितांची नवी संख्या मात्र चिंता वाढवताना दिसते आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमितांपैकी उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 77749159 इतकी झाली आहे. उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचा सरासरी वेग हा 96% इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 11360 इतकी आहे. कोरोना रुग्णवाढीच्या दुप्पटीचा सरासरी दर हा 505 दिवसांवर पोहोचला आहे. कोविड वढीचे सरासरी प्रमाण 0.14% इतके झाले आहे. मुंबई शहरात आतापर्यंत 16375 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. (हेही वाचा, Precaution Dose घेण्यासाठी 60 वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्यांना डॉक्टरांकडून कोणतेही सर्टिफिकेट घेऊन सादर करण्याची गरज नाही: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती)
मुंबई आणि एकूण राज्यातीलही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटाने वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात, प्रामुख्याने मुंबईमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या रात्रीची जमावबंदी लागू आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा नव्याने कोविड-19 निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्सची आजच एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील वाढतो कोरोना रुग्णसंख्या आणि उपाययोजना यावर विचारविनिमय झाल्याचे समजते.