देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम जरी शिथिल केले असले तरीही पुर्वीपेक्षा आता अधिक काळजी घ्यावी. दिवसागणिक राज्यात नव्या कोरोनाबाधित रुग्णांसह बळींचा सुद्धा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून कोरोनाग्रस्त रुग्णांवर अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान कोविड वॉरिअर्स म्हणून काम करणाऱ्या पोलीस दलातील आणखी 88 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसून येत आहेत. मात्र आता त्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. आता पर्यंत महाराष्ट्रातील पोलीस दलातील एकूण 4048 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच 47 जणांचे कोविड19 मुळे निधन झाले आहे.(Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, औरंगाबादसह 'या' महत्वाच्या जिल्ह्यांमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आकडेवारी एका क्लिकवर येथे पहा)
88 new #COVI19 positive cases and 1 death recorded in the last 24 hours in Maharashtra Police, taking the total number of positive cases and deaths to 4,048 and 47 deaths respectively: Maharashtra Police pic.twitter.com/eQgDvYl3bA
— ANI (@ANI) June 21, 2020
राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 124331 वर पोहचला असून 5893 जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी 62773 जणांची प्रकृती सुधारली असून 55651 जणांवर अद्याप उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे यापूर्वीचे अनेक सण लॉकडाऊनमुळे घरच्या घरी साजरे करावे लागले. तर पुढे येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. तर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना खास सूचना केल्या आहेत.