Coronavirus in India (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus Update) प्रसार वाढत असताना दुसरीकडे दिवसागणिक कोरोनाच्या रिकव्हरी रेट (Coronavirus Recovery Rate)  मध्ये सुद्धा वाढ होत आहे. भारतात कालच्या दिवशी तब्बल 63,631 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. यानुसार रिकव्हरी रेट हा 75 टक्के हुन अधिक आहे. देशात वेगाने रिकव्हरी होत असणार्‍या शहरात मुंंबई (Mumbai) किंंवा पुणे (Pune)  नव्हे तर उल्हासनगर (Ulhasnagar) चा क्रमांक पहिल्या स्थानी आहे. अलिकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर मध्ये कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 93.5 टक्के इतका पोहचला आहे. या यादीत उल्हासनगर ने चक्क दिल्लीला (Delhi) सुद्धा मागे टाकले आहे. दिल्ली मध्ये सध्या कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर आहे. When Will Coronavirus End: कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या एकूण 1,64,562 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.62% झाले आहे. तर मृत्यु दर 3.30 टक्के एवढा आहे. मुंंबई सहित राज्यातील विविध जिल्हे महापालिका क्षेत्रात रुग्णवाढीचा कालावधी देखील वाढला आहे. आकडेवारीच पाहिल्यास 1 ते 2 लाख अशी रुग्णवाढ होण्यासाठी लागला त्याहुन अधिक वेळ हा 2 चे 3 लाख रुग्ण होण्यासाठी लागला आहे.(Coronavirus Update: देशात 24 तासात नवे 69,878 कोरोना रुग्ण; एकुण 29,75,702 कोरोनाग्रस्तांपैकी अ‍ॅक्टिव्ह, डिस्चार्ज व मृत रुग्ण किती पाहा)

दरम्यान, मुंंबई मध्ये काल कोरोना रुग्णांच्या संख्येने 3 लाखाचा टप्पा पार केला आहे. एकुण 3,02,998 कोरोना रुग्णांपैकी 44 टक्के म्हणजेच 1.3 लाख रुग्ण हे मुंंबई विभागातील आहेत तर अन्य 1.6 लाख रुग्ण हे ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील आहेत, मागील काळात बीएमसी पाठोपाठ कल्याण-डोंंबिवली महापालिका भागात 25000 वर कोरोना रुग्णांची वाढ झाली होती. अजुनही हे जिल्हे व महापालिका क्षेत्र कोरोनाच्या हॉटस्पॉट यादीत आहेत.