Coronavirus Update: महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली; जाणून घ्या आजची आकडेवारी
Maharashtra Police | (PTI photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यातील नागरिकांचे रक्षण करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाला (Maharashtra Police) सुद्धा कोरोनाचा फटका बसला आहे. आज घडीला राज्यातील पोलीस दलात कोरोनबाधित एकूण 1671 रुग्ण आहेत. यामध्ये 174 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 1497 कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या पोलीस दलातील कोरोना बाधितांपैकी 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तब्बल 541 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त भाग म्हणजे मुंबई शहरामध्ये 600 पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. आजवर त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई: जेजे पोलीस स्थानकातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी यशस्वी लढा, कामावर पुन्हा रुजू होताना पाहून केली पुष्पवृष्टी (Watch Video)

मुंबई पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अलीकडे घोषित केला होता. यानुसार,कर्मचाऱ्याचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना तब्बल 65 लाखाची मदत केली जाणार आहे असे सांगण्यात आले होते. यापूर्वी पोलीस दलातील 50 वर्षांहून अधिक वयस्कर असणाऱ्या कर्मचार्यंना हा लॉकडाऊन कालावधी संपेपर्यंत फुल पगारी सुट्टीवर जाण्याची मुभा देण्याचाही निर्णय झाला होता. अनेक खबरदारीचे मार्ग वापरून सुद्धा आताही पोलिस दलातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आज महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई मध्ये तर कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 28 हजार 634 रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे देशातील कोरोना बाधितांचा आकडा हा 1,25,101 इतका आहे. यापैकी 3720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 51, 784जणांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकली आहे.