महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन हा मुद्दा आता चर्चेचा कमी आणि चिंतेचा अधिक झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना व्हायरस संदर्भात दैनंदिन माहिती आज (11 सप्टेंबर) सायंकाळी दिली. या माहितीनुसार महाराष्ट्राने आज कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 10 लाखांच्या पार (Maharashtra Crosses COVID19 Cases The 10 Lakh Mark) केली. या 10 लाखांमध्ये डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 7,15,023 इतकी आहे. असे असले तरी 10 लाख हा आकडा (Coronavirus Cases In Maharashtra) मोठा आहे. हा आकडा देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वोच्च आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 24,886 नवे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले. तर कोरोना व्हायरस संक्रमित 393 जणांचा मृत्यू झाला.
राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10,15,681 लाख इतकी झाली आहे. आतापर्यंत 7,15,023 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे. या सर्वांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मात्र, रुग्णालात वेळेत आणि योग्य उपचार झाल्याने या सर्वांची प्रकृती पूर्ववत झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 28,724 कोरोना व्हायरस संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यभरात प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,71,566 इतकी आहे. आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांची, प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या आणि मृत्यू झालेल्या सर्वांचा मिळून आकडा 10,15,681 लाख इतका असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (हेही वाचा, Violation of Mask Wearing Norms: पुण्यात 2-10 सप्टेंबर दरम्यान मास्क घालण्याच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 27,989 घटनांची नोंद; नियमाच्या अंमलबाजवणीकडे PMC आणि पुणे पोलिसांचे लक्ष)
The total number of #COVID19 cases in Maharashtra crosses the 10 lakh mark with 393 deaths & 24,886 fresh positive cases reported today
The total no. of cases in the state is 10,15,681 including 7,15,023 discharged, 2,71,566 active cases & 28,724 deaths: State Health Department pic.twitter.com/fJuyySHAAm
— ANI (@ANI) September 11, 2020
दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात सध्यास्थित उपचार सुरु असलेल्या कोरोना संक्रमितांची संख्या 943480 इतकी आहे. देशात आतापर्यंत 3542664 कोरोना संक्रमितांवर उपचार करुन बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 76271 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. देशातील या सर्व कोरोना व्हायरस संक्रमितांची आकडेवारी मिळून ती 4562415 इतकी झाली आहे.