![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/06/EZ9bF29WAAAc50J-380x214.jpg)
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाबाबत उपाययोजना म्हणून घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) हळूहळू हटविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, अद्यापही कोरोना व्हायरसवर कोणतेही औषध अधवा लस उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे अनलॉक वन सुरु होत असताना मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक हगटके संदेश दिला आहे. आपल्या संदेशात मुंबई पोलीस (Mumbai Police) म्हणात 'मनाने कितीही जवळ असा, पण शरीराने लांब रहा, कोरोनापासून दूर रहा'.
कोरोना व्हायरस संकटाची व्याप्ती. त्याच्या प्रसाराची कारणं आणि नागरिकांचा सबंध याचा विचार केला तर मुंबई पोलिसांचा संदेश अतिशह महत्त्वपूर्ण ठरतो. कारण कोणत्याही स्थितीत व्यक्तिव्यक्तिमधला संपर्क टाळणे. त्यासाठी गर्दीपासून स्वत:ला दूर ठेवणे हा एकमेव पर्याय आजघडीला दिसतो. मात्र, गेले प्रदीर्घ काळ लॉकडाऊन अनुभवत असलेले नागरिक, मित्र मैत्रिणी, प्रियकर प्रेयसी अथवा इतर कोणीही लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मुंबई पोलिसांचा संदेश अतिशय महत्त्वाचा ठरतो."कोरोनाला हरवून भेटू नंतर ध्यानी असुदे ६ फुटांचे सामाजिक अंतर मनाने कितीही जवळ असा... पण शरीराने लांब रहा... कोरोनापासून दूर रहा...''असे मुंबई पोलीस आपल्या संदेशात सांगतात. (हेही वाचा, Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद)
मुंबई पोलीस ट्विट
"कोरोनाला हरवून भेटू नंतर
ध्यानी असुदे ६ फुटांचे सामाजिक अंतर "
मनाने कितीही जवळ असा... पण शरीराने लांब रहा... कोरोनापासून दूर रहा...
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 8, 2020
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या आधीही हटके पद्धतीने सामाजिक संदेश दिले आहेत. हे संदेश देताना कधी, म्हणी, वाक्प्रचार यांचा आधार घेतला आहे. तर, कधी सण-उत्सव आणि तत्कालीन परिस्थितीचा आधार घेतला आहे. कधी कधी तर सिनेमातील डायलॉग अथवा एखादा व्हिडिओ शेअर करत त्यावर हटके प्रतिक्रिया देऊन मुंबई पोलिसांनी समाजिक संदेश दिल्याचे दसते.