Nitin Raut (Photo Credit: ANI)

 Light Bills:  देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र तब्बल सहा महिन्यानंतर लॉकडाऊन हळूहळू उठवल्याने काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोनाच्या काळात राज्यातील नागरिकांनी वाढीव वीजबिलाचा जबरदस्त फटका बसल्याचे ही दिसून आले. या कारणास्तव नागरिकांनी विविध वीज कंपन्यांच्या विरोधात संताप सुद्धा व्यक्त केला गेला होता. तसेच सरकारने या वाढीव वीज बिलाबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी ही मागणी नागरिकांनी गेली. याच पार्श्वभुमीवर आता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या काळातील वाढीव वीजबिलासंदर्भात दिवळीपर्यंत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.(Diwali Bonus: मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीत मिळणार 'एवढा' बोनस)

राऊत यांनी पुढे असे ही म्हटले की, टाटा कंपनी प्रथमच मुंबईसाठी विजनिर्मितीसाठी विविध प्रकल्पांची सुरुवात त्यांनी केली आहे. ऐवढेच नाही तर 12 ऑक्टोंबरला मुंबईसह उपनगरात ज्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित झाला होता तसे होऊ नये म्हणून त्या संदर्भात अधिक उपाययोजना करण्याची गरज भासणार आहे.(Mahapareshan Recruitment 2020: नोकरीची संधी! महाराष्ट्रात 'महापारेषण'मध्ये होणार 8500 पदांवर भरती; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती)

दरम्यान, मार्च महिन्यात मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत कर्मचाऱ्यांनी जाऊ नये अशा सुचना  देण्यात आल्या होत्या. या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येईल असे म्हटले होते. तसेच या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले होते. ज्यामुळे नागरिकांना महावितरणच्या वेबसाइटवर बिले उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्राहकांनी महावितरणाकडे नोंदविलेल्या मोबाई क्रमांकावर बिलाचे अपडेट्स पाठवण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते.