देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र तरीही काही ठिकाणी नागरिकांकडून लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पोलिसांना कायदेशीर कारवाई करत आहेत. वैद्यकिय कर्मचाऱ्यांसारखेच पोलीस सुद्धा दिवसरात्र रस्त्यावर गस्त घालून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र हेच कर्तव्य बजावत असताना दोन पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे निधन झाले आहे. याच पार्श्वभुमीवर आता मुंबई पोलिसांनी (MUmbai Police) या दोन वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पोलीस हवालदार संदिप सुर्वे (52) असे त्यांचे नाव असून मुंबईत पोलीस दलात कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या विरोधात लढा देत असताना त्यांचे निधन झाले आहे. यामुळे आता पोलीस दलाकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना सुद्धा केली जात आहे. आतापर्यंत दोन पोलीस दलातील वीरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पोलिसांचे कोरोनाच्या पारिस्थिती मधील कार्य पाहता बहुमोलाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकायची असल्यास घरीच थांबा असे आवाहन करत आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे.(Mumbai Coronavirus: मुंबईत कोरोना व्हायरसमुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू, राज्यात एकूण 96 पोलिस संक्रमित)
Tweet:
Mumbai Police lost two brave souls in a span of two days. Head Constable Sandip Surve (52) lost his life to Coronavirus.
May the departed soul rest in peace. Thoughts and prayers for the Surve family and friends.
— CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) April 26, 2020
Tweet:
मुंबई पोलीस दलातील कार्यरत पोलिस हवालदार संदीप सुर्वे ( ५२ वर्ष ) यांचे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सर्व मुंबई पोलीस परिवार सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली !!!
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 26, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. तसेच 20 एप्रिल पासून राज्यात उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. मात्र त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहेत. त्याचसोबत कोरोनाच्या नॉन-हॉटस्पॉट ठिकाणी काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत.