मुंबई (Mumbai) येथील चूनाभट्टी (Chunabhatti) परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीस मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तिने कोरोना व्हायरस संदर्भात दिशाभूल करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. तसेच, कोरोना व्हायरस हे एक सरकारी षडयंत्र असल्याचेही या व्यक्तिने आपल्या फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, कोरोना व्हायरसबाबत लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याच्या पोस्टची दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीचे नाव शमीम इफ्तेखार खान असल्याचे पुढे आले. तो कुर्ला पूर्व येथील कुरैशी नगर इथला रहिवासी आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, 'आरोपीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दावा केला होता की, कोरोना व्हायरस अस्तित्वातच नाही. सहकारने केवळ काही समूदयाला लक्ष्य बनविण्यासाठी रचलेले हे एक षडयंत्र आहे. तसेच, आपल्याला कोरोनाबाबत काही समस्या उद्भवल्या तर तपासासाठी आलेल्या आरोग्य अथवा इतर सरकारी कर्मचाऱ्यांना माहिती देऊ नका असे अवाहनही नागरिकांना केले होते.'
मंबई पोलिसांनी चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्याच्यावर भा. दं. सं. कलम 188 आणि 505 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. त्याच्यावर सर्वजनी शांतता भंग, नागरिकांकीच फसवणूक आणि विश्वासघात असे आरोप ठेवण्यात आले आहेत. (हेही वाचा,Coronavirus In Maharashtra: मंत्रालयामध्ये अधिकारी, कर्मचारी सह भेट देणार्यांंना फेस मास्क बंधनकारक; महाराष्ट्र सरकारचा नवा नियम )
पीटीआय ट्विट
36-yr-old man arrested in Mumbai's Chunabhatti for allegedly uploading Facebook post claiming coronavirus outbreak is a govt conspiracy and people should not reveal information to authorities: Police
— Press Trust of India (@PTI_News) April 5, 2020
दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने काल सांयकळी दिलेल्या वृत्तानुसार राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 443 इतकी झाली आहे. तर देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 3219 इतकी आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे 83 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 275 लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. सद्द्यास्थितीत कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3577 इतकी आहे.