केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी ज्या काही सूचना, नियम, अटी घालन दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन करा. काळजी घ्या. कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव होणार नाही हे पाहा. गेले काही महिने आपण ज्यातून गेलो आहोत तो पुन्हा पसरणार नाही याचीही काळजी घ्या आणि जिम सुरु करा. लोकांची प्रतिकारशक्ती वाढवा, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यायामशाळा व्यावसायिकांना अवाहन केले आहे.
कोरोना व्हायरस संकटामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. गेली काही महिने लॉकडाऊन स्थिती सुरु आहे. त्यानंतर आता कुठे केंद्र आणि राज्य सरकार अनलॉक करण्याबाबत विचार करत आहे. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास दोन्ही सरकारांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, व्यायामशाळा सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्यांवर सोपवण्यात आला आहे. राज्य सरकारने जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास अद्याप परवानगी दिली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची तेचे निवासस्थान कृष्णकुंज येथ भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा, Ram Mandir Bhumi Pujan : रामाचा वनवास संपला- राज ठाकरे)
"केंद्र सरकारतर्फे दिल्या गेलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं, सर्व नियमांचे पालन करून व्यायामशाळा सुरू करा." मनसे अध्यक्ष @RajThackeray pic.twitter.com/rtKTbZKOPS
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 11, 2020
दरम्यान, टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मी राज्य सरकारला म्हटलं होतं की, गोल्फ आणि टेनिसमध्ये सर्वाधिक सोशल डिस्टन्सिंग असतं. पण, त्यांनी काही ऐकलं नाही. मग मिच म्हटलं.. मरुन दे आणि खेळायला सुरुवात केली. तुमच्या ध्यानात आलेच असेल मला काय म्हणायचं आहे. तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला आहे.