महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता आता सरकार अधिक सक्षमतेने त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आज सकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 101 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये प्रामुख्याने परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये हा जीवघेणा विषाणू आढळला. मात्र जनसामान्यांमध्ये कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून सामाजिक जनजागृती, संचारबंदी ते अगदी आता विविध भागांचं निर्जुंकीकरण करण्यापर्यंत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आज (24 मार्च) दिवशी मुंबई अग्निशमन दलाकडून महानगरपालिका रूग्णालयाच्या आवारात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. ANI ट्वीट नुसार, पाण्यामध्ये Sodium Hydrochloride Solution मिसळून क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल च्या माध्यमातून त्याचा फवारा केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या क्वारंटाईनची सोय देण्यात आलेल्या भागामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे. Coronavirus Pandemic: भारतामध्ये Small Pox, Polio प्रमाणेच 'कोरोनाचं संकट' थोपवण्याची क्षमता; WHO ने व्यक्त केली 'ही' मोठी अपेक्षा.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा हा शहरी भागांपैकी मुंबई मध्ये सर्वाधिक आहे. सध्या कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी राज्यात कलम 144 अंतर्गत जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Coronavirus Death In Maharashtra: कोरोनाचा मुंबईत तिसरा बळी; UAE हुन परतलेल्या 65 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू.
ANI Tweet
Maharashtra:Work of sanitisation of Municipal Hospital is underway by a team of Mumbai Fire Services. An officer says,"We're using Quick Response Vehicle to spray disinfectant Sodium Hydrochloride Solution diluted in water. Priority to be given to quarantine facilities." #COVID19 pic.twitter.com/OVwcYaIvii
— ANI (@ANI) March 24, 2020
दरम्यान मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयामध्ये काल युएईमधून भारतात दाखल झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर काल मृत्यू कोरोनाबाधितांपैकी एक फिलिपाईन्सचा देखील व्यक्ती आहे. मात्र त्याच्या मृत्यूमागे अस्थमाचा त्रास आणि इतर आजार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, औरंगाबाद, नवी मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.