Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) आणखीन एका रुग्णाचा काल मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) मृत्यू झाला आहे, यासोबतच महाराष्ट्रातील हा तिसरा कोरोना बळी ठरला आहे. संबंधित रुग्ण हा 65 वर्षीय असून नुकताच UAE हून परतला होता. या रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता, यामुळे परिस्थिती गंभीर होती त्यातच कोरोनाचा त्रास बळावल्याने काल या व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रसारापासून वाचण्यासाठी मधुमेह, अस्थमा, उच्च रक्तदाब व अधिक वयाच्या व्यक्तींना अधिक सतर्क राहावे असे आवाहन काल आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यातर्फे करण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या ही शंभर पार गेली आहे. आज पुणे येथे तीन नवे तर सातारा येथे 1  नवा रुग्ण आढळल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 इतकी झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, अजूनही ही व्हायरसची लागण परदेशातून आलेल्या व्यक्तींपर्यंत आणि अगदीच त्यांच्या संपर्कात आलेल्यांपर्यंतच मर्यादित आहे, कोणत्याही नागरिकाला अचानक आणि नव्याने हा त्रास उद्भवलेला नाही.त्यामुळे अजूनही महाराष्ट्र सामुदायिक लागण असलेल्या कोरोएच्या तिसर्या टप्प्यात पोहचलेले नाही.

ANI ट्विट

दरम्यान, कोरोनच्या चिंताजन्य वाढत्या रुग्णानाच्या आकडेवारीत समाधानाची गोष्ट अशी कि आज कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्णांची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. परिणामी हा आजार बरा होऊ शकतो हे समाधानात्मक वृत्त आहे.