राज्यातील जनतेसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital in Mumbai) उपचार घेत असलेल्या 12 कोरोना बाधित रुग्णांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाच्या संकटातून मुक्त झाले आहेत. या बाराही रुग्णांची कोरोना व्हायरस (COVID-19) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरस रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांची नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात आली. एका वृत्तवाहीणीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह आली असली तरी, धोका अजून संपलेला नाही. या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर राज्यभरात सुरु असलेल्या संचारबंदी आदेशाचेही नागरिकांनी पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्र आणि देशात आपला प्रादुर्भाव वाढवताना दिसतो आहे.
एकट्या महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस बाधिक रुग्णांची संख्या 101 इतकी झाली आहे. तर देशातील एकूण कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 503 वर पोहोचली आहे. सांगली येथे काल कोरोना व्हायरस बाधित 4 रुग्ण सापडले. तर आजही पुणे येथे 3 तर सातारा येथे एक नवा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संकटाचे सावट आता अधिकच गडद झाले आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्र शंभरी पार, देशातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 503; COVID-19 संटक वाढले)
जगभरातील कोरोना व्हायस बाधित देशांमध्ये महाराष्ट्रातील काही लोक थांबले आहेत. ते तेथे नोकरी, व्यवसाय करत आहेत. काही तिकडेच स्थायिक झाले आहेत. ते भारतीयांना अवाहन करत आहेत की, काही झाले तरी घरात बसा. आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे अवाहन ते करत आहेत. इटली, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या बलाढ्य देशांची झालेली अवस्था ते अतिशय करुनपणे सांगत आहेत. त्यामुळे आपण सर्व नागरिकांनी काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे आवश्यक असल्याचे अवाहन राज्य सरकार वारंवार करत आहे.